आगामी लोकसभा निवडणूक ही बॅलेट पेपरवरती घ्या

राष्ट्रपतींना निवेदन सादर
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
सुवर्ण भारत विशेष प्रतिनिधी EVM मशीन व्दारे निवडणूक पध्दतीवर बॅन आणून आगामी निवडणूक ही बॅलेट पेपर वरती घेण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी काल बुधवारला समता सैनिक दल आणि भारतीय बौध्द महासभा चंद्रपूरच्या पुढाकारातून सामाजिक, धार्मिक ,शैक्षणिक, वकील व राजकीय पक्षांच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी चंद्रपूर जिल्हा समता सैनिक दलच्या ॲड.पुनम वाघमारे -उमरे ,समता सैनिक दल जिल्हाध्यक्ष धम्मदीप मेश्राम,मैत्रेय बुद्ध विहारचे उपाध्यक्ष दिलीप सोरदे, मनोज गणविर,समता सैनिक दल विदर्भ अध्यक्ष राजेश भसारकर, आपचे युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे,केवलराम रामटेके, शेषराव सहारे अनंत बाबरे,नभा संदीप वाघमारे, अशोक फुलझेले, वंचित बहुजन आघाडीच्या मोनाली धीरज पाटील राजकुमार जवादे या शिवाय विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते , वकील मंडळी शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येंने उपस्थित होती.मागणीची पूर्तता न झाल्यास देशव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सादर केलेल्या निवेदनातुन दिला आहे.सदरहु ईव्हीएम मशीन लोकशाही प्रणालीला घातक असून ती हॅक सुध्दा होते.येत्या 2024मधील होणा-या निवडणूका या बॅलेट पेपर पद्धतीने घेण्यात याव्या असे स्पष्ट मत समता सैनिक दलच्या अधिवक्ता पुनम वाघमारे -उमरे यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले .