विदर्भातील जेष्ठ साहित्यिक विजया भांगे यांना जिजाऊ पुरस्कार बहाल

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
विदर्भाच्या अमरावती येथील नंबर वन न्यूज चॅनलचे संस्थापक नितीन मुळे यांनी महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राच्या जिजाऊ म्हणून निवड करण्या साठी कर्तबगार महिलांच्या कार्याचे प्रस्ताव या पूर्वीच मागितले होते. आलेल्या प्रस्तावातून 20 महिलांना त्यांच्या विशेष उल्लेखनीय कार्याची नोंद घेत त्यांना नुकतेच पुरस्कार जाहीर केले. त्यात महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक मार्गदर्शिका तथा विदर्भातील पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिक विजया डी.भांगे यांना महाराष्ट्र जिजाऊ म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे. सदरहु पुरस्कार समारंभ अकोलाच्या पंजाबराव कृषी विद्यापीठात घेण्यात आला होता.या वेळी व्यासपीठावर अकोला येथील अनेक पुरस्कार प्राप्त मंडळी उपस्थित होती.भांगे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, रंज्जू मोडक व नलिनी आडपवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.