ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील जनतेचा राजकीय कल आप च्या दिशेने

१३ जिल्हयातील ७० ग्रामपंचायतीत आप चे उमेदवार विजयी

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

दिल्ली प्रशासनातील सुशासन व विकास तसेच पक्षाचे तत्त्व आणि अनुशासन व योजना नियमण दैदिप्यमान आहे . त्याचा परिणाम महाराष्ट्रातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसुन आला. जवळपास ३०० आप उमेदवारांपैकी ७० उमेदवार विजयी झाले . त्यातही ५० टक्के उमेदवार महिला आहेत .
नागपुर , चन्द्रपुर , नाशिक , गोंदिया , भंडारा , यवतमाळ , अहमदनगर , जालना , पालघर , हिंगोली , लातुर आणि सोलापुर जिल्हयात आप ने जागा लढविल्या होत्या .
छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , राजर्षी शाहु महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील जनतेने लोक स्वराज्य , सामाजिक समानता आणि न्याय ने बांधील अशा विचारसरणीच्या मतदारांनी आम आदमी पक्षास पंसती दिली आहे . नक्कीच ही मतदारांची परिवर्तनशील भुमिका आहे . यामुळे आप ची कामगीरी चांगली आहे , व त्याचे स्थान महाराष्ट्रात सिद्ध होत आहे .
आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय शिंदे म्हणाले की, निवडून आलेल्या प्रतिनिधी ग्रामपंचायतींमध्ये चांगले कार्य करू शकेल अशी परिवर्तनशील भूमिका व विकास या दोन्हीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी सक्षम आहेत. श्री धनंजय शिंदे पुढे म्हणाले .
“आप’ची कामगिरी आश्चर्यकारक आहे. हे आमचे स्थान सिद्ध करते आणि हे सिद्ध करते की देशभरातील लोक बदल आणि सुशासन मिळवण्याची तळमळ करत आम्ही आमच्या सर्व मतदारांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो ज्यांनी आपल्यावर मोठा विश्वास दाखवला व जबाबदारी दिली”.
आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व प्रवक्ते प्रिती शर्मा मेनन म्हणाल्या आमच्या दिल्लीतील सरकारने सुशासन म्हणजे काय हे दाखवुन दिले असून महाराष्ट्रात दिल्ली विकास मॉडेल चे लवकरच अनुकरन होईल असे वाटते . प्रस्थापित राजकीय पक्षांना झुगारुन मतदारांनी आप ला कैाल दिला आहे . या संधीचे सोने करुन आप जनसेवेस कटीबद्द राहुन राज्यभरातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये आपले स्थान अधिक मजबुत करन्याची आशा वाटते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close