भिसी येथे राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघाची शाखा गठीत-अध्यक्ष पदी रजनी भुजाडे यांची निवड
भिसी प्रतिनिधी : विलास दिघोरे
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी. जनगणनेत ओबीसी चा काँलम निर्माण व्हावा व ओबीसी समाजाची चळवळ तयार करण्यासाठी भिसी येथे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची शाखा ग़ठीत करण्यात आली. ओबीसी समाजाला संविधानीक अधिकार मिळावा. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे यासाठी महिला सक्षमिकरणाची गरज आहे या हेतूने शाखा गठित करण्यात आली
राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ शाखा भिसी च्या अध्यक्ष पदी रजनी भुजाडे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी शुभांगी बोरकर यांची निवड करण्यात आली. सचिव पदी दामिनी घोंगडे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष पदी प्रणिता सहारे यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्ष पदी रजनी भलमे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजाननराव अगडे, प्रमुख पाहुणे म्हणून सौ ममता डुकरे, कवडू लोहकरे, ईश्वर डुकरे, सौ माधुरी रेवतकर उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिका-याचे अभिनंदन करण्यात आले.