ताज्या घडामोडी

सावरी (बिड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

आरोग्य केंद्राची ईमारत बांधकाम पुर्ण लोकप्रतिनिधीला व आरोग्य विभागाला दोन वर्ष पासुन उद्घाटनाच्या मुहूर्त तारिख काही मिळाली नाही प्रहार सेवक विनोद उमरे व गावकऱ्यांना प्रश्न

चिमूर तालुक्यातील सावरी बिड येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रसाठी नविन इमारतीचे बांधकाम दोन वर्ष पूर्ण झाले .मात्र ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन इमारत बांधूनही येथिल कारभार जीर्ण इमारतीत सुरू आहे जीर्ण इमारतीत रुग्णांना योग्य त्या सोय सुविधा मिळत असल्याने रुग्णांना अडचणीचा निर्माण होत आहे . त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नव्या इमारतीत हलविण्यात यावे रुग्णांना योग्य सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे व नविन इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी वारंवार प्रहार सेवक विनोद उमरे व त्यांचे सहकारी प्रहार सेवक रमेश वाकडे मुरलीधर रामटेके सचिन घानोडे नारायण निखाडे संदिप निखाडे यांनी वारंवार लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाकडे तक्रार केली पण आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी उद्घाटनाच्या मुहूर्त काही मिळाला नाही या आरोग्य केंद्रात ४२गावांचा सामावेश असुन तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र आहे तालुक्यातील शेवटच्या टोकांवर हे आरोग्य केंद्र आहे त्यामुळे रुग्णाना योग्य ते सोय सुविधा मिळत नाही मात्र दोन वर्ष लोटूनही आरोग्य केंद्र नविन इमारतीत स्थलांतरित करण्यात आलेले नाही त्यामुळे नागरिकांना आशेवर पाणी पेरले आहे दोन वर्ष पासुन आरोग्य विभागाला व लोकप्रतिनिधी यांना उद्घाटनाची तारिख मिळाली नाही काय असा प्रश्न गावकऱ्यांना व प्रहार सेवक यांना पडला आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close