ताज्या घडामोडी

नवोदय विद्यालयाच्या अपूर्वाने मिळविले दहावीच्या परीक्षेत 98.4 टक्के गुण

शाळेतून आली ” ती “प्रथम!

अनेकांनी केले अपूर्वाचे अभिनंदन!

प्रतिनिधिःरामचंद्र कामडी

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तळोधी बाळापूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाची दहावीत शिकणारी अपूर्वा माधव बन्सोड हिने 98.4 टक्के गुण मिळवित शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. विद्यालयाची शिस्त , नियमित अभ्यास, व कठोर पारिश्रम घेण्याच्या बळावर अपूर्वाने हे घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील शिक्षक तदवतचं आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन आपणांस वेळोवेळी मिळत असल्याचे तिने या प्रतिनिधीशी आज बोलताना सांगितले .अपूर्वाने परीक्षेत मिळविलेल्या यशाचे कौतुक अनेकांनी केले असून महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मार्गदर्शिका उपराजधानी नागपूरच्या मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक व सहसंयोजिका वर्षा कोंगरे यांनी अपूर्वाचे अभिनंदन केले आहे. अपूर्वाचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

नोकरी सांभाळून त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले हे विशेष!
बारावी नंतर चांगले यश संपादन करून डॉक्टर किंवा अभियंता होण्याचा अपूर्वाचा मानस आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close