ताज्या घडामोडी

14 एफ्रिलला होतोय मराठी चित्रपट बबली प्रदर्शित

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

नव्याने तयार झालेला मराठी चित्रपट “बबली “येत्या १४एफ्रिलला विदर्भात सर्वत्र प्रदर्शित होत असून चंद्रपूर शहरातील राधाकृष्ण सिनेमा हाॅल ,मिराज व एमडी माॅल मध्ये देखिल तो चित्रपट सिने रसिकांना बघावयास मिळणार आहे.दरम्यान या मराठी चित्रपटातील कलावंत गगन कुमार,मानसी सुभाष ,त्यांचे मित्र विवान ,चौथमल व निर्माते सतीशजी सामुद्रे यांचा काल रविवार दि.9एफ्रिलला दुपारी शहरातील एका नामवंत व बड्या हाॅटेल मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार कार्यक्रम पार पडला.या वेळी सिनेकलावंतांनी एक नृत्य सादर करुन उपस्थितीतांचे लक्ष वेधले.या चित्रपटातील गाणे सुरेख व सुंदर असुन निश्चित तो चित्रपट सिने प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी निर्मात्यांना व बबलीच्या कलावंतांना अपेक्षा आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close