ताज्या घडामोडी

लोककला हाच जनतेचा खरा विरोधी पक्ष: ॲड. भुपेश वामनराव पाटील

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे


भारताच्या सामाजिक व्यवस्थेत लोककला ह्या समाजमनाचा आरसा असुन ते केवळ मनोरंजनाचे आणि प्रबोधनाचे साधन नसुन लोककला ह्या सामान्य जनतेच्या विरोधी पक्षाचे कामही चोखपणे बजावतात. लोककलांच्या विविध प्रकाराचा ऱ्हास झाल्याने दुर्दैवाने भारतीय जनतेने आपल्या हक्काचा विरोधी पक्ष सुद्धा गमावला असल्याची खंत प्रख्यात साहित्यिक व कवी ॲड. भुपेश वामनराव पाटील यानीं व्यक्त केली.

चिमूर तालुक्यातील खापरी डोमा येथे आंबेडकरी लोककला महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध साहित्यिक व कवी ॲड. भुपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्यानीं वरील चिंता व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यानीं प्राचीन लोककलांचे प्रकार, आधुनिक लोककला प्रकार स्वातंत्र्यपुर्वकाळातील लोककलावंत शाहीर, लोककलांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान इत्यादी अंगानां स्पर्ष केला तसेच लोककला आणि लोककलावंत यानां सन्मान प्राप्त करून देन्याची सामाजिक जबाबदारी सर्वानीं स्विकारण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली.

या आंबेडकरी लोककला महोत्सवाला संपूर्ण विदर्भातील लोककलावंत शाहीर वादक इत्यादी मंडळी सहभागी झाली होती. महोत्सवाचे उदघाटन प्रा. पुष्पा घोडके यानीं केले तर या प्रसंगी प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. अनमोल शेंडे, सुनंदा रामटेके, शाहिर धर्मदास भिवगडे लोकनाथ शेंडे व मुख्य आयोजक व लोककलांचे अभ्यासक प्रा. आत्माराम ढोक उपस्थित होते.

सम्मेलनाच्या दुसऱ्या सत्रात विदर्भातील प्रसिद्ध कवी सुरेश डांगे यांचे अध्यक्षतेखाली कवी सम्मेलन संपन्न झाले कवीसम्मेलनात कवी खेमराज भोयर यानीं बहारदार संचालन केले.

या महोत्सवात विदर्भातील अनेक लोककलावंत, शाहीर, वादक, भजन मंड्ळाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींनां वामनराव पाटील स्मृती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करन्यात आले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठि जनार्धन रामटेके सुमंत वाकडे इत्यादीच्या नेतृत्वातील विविध समीतीच्या कार्यकर्त्यानी व गावकरी मंडळीनी मेहनत घेतली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close