मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे)विरूद्ध गुन्हा दाखल करावा
सकल बहुजन समाजाच्या वतीने निवेदन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे सतत महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकत असतात ,नूकतेच अमरावती येथे जाहीर कार्यक्रमात आमचे व समस्त भारतवासीयांचे आराध्य दैवत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी अपशब्द वापरुन गरळ ओकली असुन त्यामुळे आमच्या समाज भावना दुखावल्या असुन अमरावती येथील व्हिडिओ क्लिपची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याचे पुढील कार्यक्रम रद्द करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन पाथरी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले .सदर निवेदनात विश्वंभरगिराम, उध्दव इंगळे, अमोल इंगळे,विक्रम गायकवाड,मदन हारकळ, दत्ता शिंगनापुरे, विकास मानोलीकर, सचिन गिराम, रामेश्वर हारकळ,सचिन सोगे,माधव कदम,नितिन कांबळे,रवि मानोलीकर,राधे गिराम ज्ञानोबा चिंचाणे,किशोर बोराटे दिपक कटारे व असंख्य सकल बहुजन समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.