४९ व्या विज्ञान प्रदर्शनी चा बक्षीस सोहळा संपन्न
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
जगाची प्रगती भारतीयांमुळे आहे.जगाच्या प्रगतीमध्ये भारताचे योगदान जास्त आहे.ग्रामीण भागात चळवळ निर्माण झाली पाहिजे.एकवेळ अमेरिकेने आपल्याला कॉम्प्युटर देण्यास मनाई केली होती.परंतु शेवटी कॉम्प्युटर भारतानेच निर्माण केले.वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले अनेक वैज्ञानिक या भारतभूमीत घडले आहे.विज्ञान प्रदर्शनिमुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला व कलेला एक चालना व ऊर्जा मिळते.वैज्ञानिक वातावरण निर्माण झाले पाहिजे.असे प्रतिपादन कर्मवीर शाळेत झालेल्या १ व २ सप्टेंबर ला पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात अध्यक्षीय मार्गदर्शनात ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोपाळराव एकरे यांनी केले.
कार्यक्रमात जेष्ठ साहित्यकार कविवर्य ना.गो.थुटे व शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव राऊत यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
४९ व्या तालुका विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन कर्मवीर शाळा वरोरा येथे १ व २ सप्टेंबर 2022 ला आयोजित करण्यात आले होते.बक्षीस वितरण सोहळा २ सप्टेंबरला पार पडला.कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रा.शी.
मंडळाचे सचिव गोपाळराव एकरे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यकार ना .गो.थूटे सर, गटशिक्षणाधिकारी चहारे सर ,परीक्षक प्रा.गजरे सर ,मत्ते सर,लांजेवार मॅडम,प्रमुख पाहुणे म्हणून
शिक्षण विस्तार अधिकारी काळे ,शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव राऊत , कर्मवीर शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र बोरीकर ,केंद्रप्रमुख संदीप चौधरी ,पत्रकार प्रदीप कोहपरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेंद्र बोरीकर यांनी केले.
विज्ञान प्रदर्शनीत जवळपास 100 प्रोजेक्ट सादर करण्यात आली होती.तालुक्यातील शाळा विद्यार्थी व शिक्षकांनी प्रयोग,प्रतिकृती,मॉडेल,चार्ट सादर केली होती.प्रा.गजरे सर,मत्ते सर,लांजेवार मॅडम यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्राथमिक सर्वसाधारण पी.२५ हवामान बदल,अरविंद विद्यानिकेतन वरोरा विजेता प्रतीक हरिदास पाचभाई,पी.-१५ पोट भरणारी भिंत,स्वर्गीय दादासाहेब देवतळे हायस्कुल आजनगाव ,सृजल विजय ढाले,प्राथमिक आदिवासी पीटी -६-रेन वॉटर हार्वेस्टिंग ,जी.प.उच्च प्राथमिक शाळा मोखाला-अंजली प्रशांत आवारी,प्राथमिक शैक्षणिक साहित्य निर्मिती भारतीय नाणी,शिक्षक-अमृत शंकर गेडाम ,जी.प.उच्च प्राथ.शाळा अर्जुनी,माध्यमिक सर्वसाधारण हिरालाल लोया विद्यालय वरोरा,अँटी स्लीप अलार्म
ड्राइव्ह,स्मित टिपले, रिव्हर क्लीनिंग बोट,आर्यन चाफले,जयेश गायकवाड कर्मवीर विद्यालय वरोरा, माध्यमिक आदिवासी -छत्रपती शिवाजी विद्यालय खांबाडा ,वनस्पतीजन्य व प्राणिजन्य पदार्थापासून वीज निर्मिती करणे-योगेश माणिक कोठेकर , माध्यमिक लोकसंख्या
शिक्षण-कर्मवीर विद्यालय वरोरा,स्त्रिभुण हत्या-एक सामाजिक समस्या शिक्षिका-माधुरी सोनटक्के, माध्यमिक शैक्षणिक साहित्य निर्मिती -प्रकाशीय उपकरणे-कर्मवीर विद्यालय वरोरा -शिक्षक कर्मवीर विद्यालय मधेलीमध्यमिक शैक्षणिक साहित्य निर्मिती साई विद्यालय वंधली -प्रयोग शाळा सहाय्यक -गोपाल मोहन पायघन
या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र व शिल्ड वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन माने सरांनी केले.