महाराजस्व अभियान शासन आपल्या दारी या उपक्रमातून विविध शासकीय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व साहित्य वितरण

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते 55 हजार लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आज दि.१५ ऑगस्ट रोजी आ. रत्नाकर गुट्टे यांनी मागील एक महिन्यापूर्वी आपण मतदार संघातील 35 हजारापेक्षा प्रलंबित कामे पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट रोजी देणार असल्याचे सांगितले होते. आ. गुट्टे यांनी महिन्यापासून सुरू ठेवलेल्या विशेष प्रयत्नामुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित कामाचे प्रमाणपत्र “महाराजस्व अभियान” शासन आपल्या दारी या उपक्रमातून मतदार संघातील विविध शासकीय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व साहित्य वितरण सोहळा उपविभागीय कार्यालय गंगाखेड येथे पार पडला.
मतदार संघातील शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या नागरिकांचे शासनदरबारी प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वास नेऊन सदरील कामाचे जवळपास ५५ हजार प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यासंदर्भात आमदार गुट्टे यांनी एक ते दीड महिन्यापासून अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन महत्त्वपूर्ण सूचना देऊन वेळ प्रसंगी खडे बोलही सुनावले होते. त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड,पालम व पूर्णा तालुक्यातील यामध्ये विविध विभागाशी संबंधित मंजूर फेरफार ची संख्या गंगाखेड-659,पालम- 1288, पूर्णा-1614,महसूल शाखा अंतर्गत गंगाखेड-261,पालम-2370,पूर्णा-850,पुरवठा विभागांतर्गत गंगाखेड-4184,पालम-900,पूर्णा-135,निवडणूक विभागा अंतर्गत गंगाखेड-1646,पालम-1243पूर्णा-1952, विविध दाखले प्रमाणपत्र- गंगाखेड-4552, पालम-1403, पूर्णा-10368,आरोग्य विभागांतर्गत- गंगाखेड-319,कृषी विभागांतर्गत- गंगाखेड-284, पालम-2180 पूर्णा-506, नगरपालिका विभागांतर्गत- गंगाखेड-338,पालम-407, पूर्णा-00,पंचायत समिती अंतर्गत- गंगाखेड-10120,पालम-00,पूर्णा-1141 राज्य परिवहन विभाग अंतर्गत- गंगाखेड-185,पालम-00 पूर्णा-00, विद्युत वितरण विभागाअंतर्गत- गंगाखेड-172, पालम-00,पूर्णा-00,अशा विविध विभागातील 55 हजार प्रमाणपत्रांची नागरिकांना/ लाभधारकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आ. गुट्टे यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला असेच म्हणावे लागेल. आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन राबविलेल्या या खास मोहिमेमुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिकांचे शासन दरबारी प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वास गेली असल्याने सर्वसामान्य लाभार्थ्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, जि.प.स. किशनराव भोसले,राजेश फड, पं.स.सभापती छायाताई मुंजाराम मुंडे,मगर पोले,नितीन बडे,लक्ष्मण मुंडे यांच्यासह तालुक्यातील लाभार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.