ताज्या घडामोडी

बेटी बचाव दिनाचे औचित्य साधुन महिला मुक्ति मोर्चा चंद्रपूर च्या वतीने वृक्षारोपण

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

महिला मुक्ति मोर्चा चंद्रपूर जिल्हा तसेच शहर पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर परिसरात तसेच शहरात अनेक ठिकाणी बेटी बचाव दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण केले .
सदर वृक्षारोपण करण्याकरीता चंद्रपूर जिल्हा विधी सल्लागार अॅड. मदन भैसारे ,जिल्हा महासचिव अजय गोवर्धन , शहर अध्यक्षा श्वेताताई फंदी , शहर उपाध्यक्षा सुषमाताई कोरेवार , शहर महासचिव किर्तीताई गुरुनुले ,सदस्या वंदना दोरके व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर जिल्हा तसेच शहर पदाधिकारी हे सामान्य माणसाच्या समस्यांचे नेहमीच निवारण करत असतात त्याचबरोबर कामात समोर राहण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात त्याच उपक्रमापैकी वृक्षारोपण हा एक उपक्रम आहे . त्यांचे असे उपक्रम पाहुन जनता समाधान व्यक्त करीत आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close