ताज्या घडामोडी

विश्व समाज सुखी करण्यासाठी भारतीय संस्कृती परम श्रेष्ठ- प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्ष पुर्ती समारोह प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते तथा (अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले की, संस्कृती ही राष्ट्रीय संपत्ती असून संस्कृती रक्षणावरच राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असते. श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या अर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, संघटन चिंतन विषयक अभ्यासपूर्ण मांडणी केली तसेच अर्थव्यवस्थेत भारतीय कुटुंबीयांनी अर्थिक बचतीला महत्त्व दिले आहे यावरच देशातील कुटुंब व्यवस्था ही जगामध्ये सर्वात बळकट आहे.


या समारोप सत्राचे अध्यक्ष तथा भा शि प्र संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलूरकर, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, डॉ पुरुषोत्तम कुलकर्णी ( लातूर विभाग संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) तर व्यासपीठावर नितीन शेटे(कार्यवाह- भा शि प्र संस्था), राधेश्याम लोहिया (उपाध्यक्ष- भा शि प्र संस्था), किरणराव भावठाणकर (अध्यक्ष – केंद्रीय विद्यासभा) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुलाने श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवन कार्यावर आधारित तयार केलेल्या ग्रंथाचे तसेच भारतीय विचार साधना प्रकाशनाचे सुरेशजी सोनी यांच्या ग्रंथाचे प्रकाशन मंचावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सत्राच्या अध्यक्षीय भाषणात डॉ सुरेंद्र आलूरकर यांनी सांगितले की, श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी हे व्यक्तीमत्व सूर्यासारखे असून समाजातील सर्व घटकापर्यंत भारतीय विचार पोहचवण्याचे कार्य केले. या सत्राचे प्रास्ताविक बिपीन क्षीरसागर, आभार केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अप्पाराव यादव तर सुत्रसंचालन श्रीमती निता मोरे यांनी केले.
श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्ष पुर्ती समारोह कार्यक्रम चार सत्रांमध्ये घेण्यात आला. सर्वप्रथम दीपप्रज्वलन व भारत माता, श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले. उदघाटन सत्राचे (बीज भाषण) अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तथा जन्मशताब्दी वर्ष समारोह समितीचे अध्यक्ष राधेश्याम लोहिया तर प्रमुख मार्गदर्शक तथा संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे हे होते. यावेळी नितीन शेटे यांनी श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांची जन्मशताब्दी निमीत्त विविध उपक्रम का घेण्यात आले, समाजाच्या विविध स्तरापर्यंत दत्तोपंत ठेंगडी यांचे विचार पोहचवणे का आवश्यक आहे हे सविस्तर पणे मांडले. या सत्राचे अध्यक्षीय समारोप राधेश्याम लोहिया यांनी केले, प्रास्ताविक प्रा डॉ गजानन होन्ना यांनी, आभार श्रीमती अपर्णा गोस्वामी तर सुत्रसंचालन जितेंद्र जोशी यांनी केले. दुसरे सत्राचे ( दर्शन) अध्यक्ष तथा केंद्रीय विद्यासभेचे अध्यक्ष किरणराव भावठाणकर तर व्यासपीठावर बिपीन क्षीरसागर, विष्णू सोनवणे, जितेंद्र जोशी,प्रा डॉ गजानन होन्ना इत्यादी उपस्थित होते. यावेळी संस्थेतील विविध संस्कार केंद्राने वर्षभर घेतलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रम यामधून आलेले अनुभव कथन केले. तिसऱ्या सत्राचे ( शोध बोध) अध्यक्ष नितीन शेटे तर प्रमुख मार्गदर्शक शरदराव हेबाळकर हे होते. यांनी यावेळी श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचे विचार व कार्य यामधून प्रेरणा घेऊन आपण आपल्या क्षेत्रात काम केले पाहिजे असे सांगितले. या सत्राचे अध्यक्षीय समारोप नितीन शेटे यांनी केले. या सर्व कार्यक्रमाची सांगता समरसता मंत्राने झाली. समरसता मंत्र प्रा डॉ गजानन होन्ना यांनी सांगितले.
या सर्व कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे, डॉ हेमंत वैद्य, सौ कल्पनाताई चौसाळकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अप्पाराव यादव, तसेच श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे, अभय कोकड, प्रेमकिशोर मानधने, अॅड विश्वास जोशी, तेजस महाजन, जगदीश साखरे, सर्व संस्था सभासद, पदाधिकारी, प्राचार्य डॉ महेश देशमुख, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, मुख्याध्यापक प्रदिप जोशी, सौ वंदना मिटकरी तसेच संस्थेतील विविध संस्कार केंद्राचे स्थानिक समन्वय समितीचे पदाधिकारी, पत्रकार, सर्व श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्ष स्थानिक संयोजन समितीचे सदस्य, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close