ताज्या घडामोडी

लिटिल चॅम्पियन इंग्लिश स्कूल शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शहरातील लिटिल चॅम्पियन इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या प्राचार्य सरस्वती दळवे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तुळशीराम दळवे उपस्थित होते.याप्रसंगी शरण्या कुगणे,आराध्या अवचार, सिद्रा मारीयम,सिद्धी अवचार, सोहम शिंगारे,पूर्वा अवचार,तनुजा अवचार, पुनम आहेर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विचार मांडले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरस्वती दळवे यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले . आजच्या महिलांनी सावित्रीबाई फुले सारखे कार्य करावे असे मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी माता सावित्री यांच्या वेशभूषा मध्ये होत्या. सूत्रसंचालन ममता पांचाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता स्वामी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाग्यश्री भुजबळ, गायकवाड, सूर्यवंशी, यांनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close