आमदार प्रतिभाताई धानोरकर व महिला काँग्रेसच्या वतीने खांबाडा येथे हळदी कुंकू व स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
चंद्रपूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरोरा भद्रावती विधानसभेतील खांबाडा येथे काल वरोरा भद्रावती विधानसभा महिला आघाडी च्या वतीने हळदी कुंकू व स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना संघटित राहण्याचे महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रामुख्याने मंचावर महिला काँग्रेस अध्यक्षा रत्नाताई अहिरकर, ताराबाई देवतळे,यशोदा खामनकर सरपंच ग्रामपंचायत बोर्डा, वैशाली कडुकर, विनाताई देठे, चंद्रकला जोगे, नलुताई जोगे, वाघ ताई यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता खांबाळा येथील वाघ मॅडम, शशिकला बावणे, यामिनी तोडासे, चंद्रकला जोगे, निर्मला महाकुलकर, मंगला शेळकी, सविताताई डफ, धृपदा ताई आत्राम, निर्मला ठाकरे, कविता ताई खोडके, सुनंदाताई ढोंबळे, कोंडाबाई धानोरकर, वनिता बावणे, ज्योत्स्ना मेश्राम ,कोलारकर ताई, सुनिता वैद्य, शारदा भोयर, बेबीताई कडुकर, मायाताई धोटे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या हळदी कुंकू कार्यक्रम आणि स्नेह मिलन सोहळ्याला खांबाडा येथील महिला बचत गटाच्या महिला व या भागातील सर्व बचत गटाच्या महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.