संविधान दिन व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वर्धापण दिना निमित्त पाथरी ग्रामीण रूग्णालयात फळे वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.२६/११/२०२१ : पाथरी येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचा तिसरा वर्धापन दिना निमित्ताने समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संघपाल उमरे सर यांचे आदेशावरुन ग्रामीण रूग्णालय, व RH सरकारी दवाखान्यातील पेशेंटला आणि रूगणालयातील नर्स, महिला तसेच आरोग्य सेवक यांना फळे वाटप करण्यात आले.

वैद्यकीय अधिक्षक मा. डॉ. सुमंत वाघ,मा.अकबर पठाण यांनी या उपक्रमला सहकार्य व मदत केली सर्व समितीच्या पदधिकारी मा. सौ. रेखाताई मनेरे मराठवाडा महिला विभाग प्रमुख,सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे,सौ.सुमन साळवे सौ.आहिलयाबाई तुपसमींद्रे, सौ.लता रतन साळवे,सौ.सुशिलाबाई मनेरे,सौ.रेणुका अनंत सावळे,सौ.शिला गायकवाड ANM,छाया मोगरे सिस्टर,ढगे सिस्टर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठवाडा विभाग,परभणी जिल्हा, व पाथरी विभागातील पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पदधिकाऱ्यांनी या उपक्रम साठी परिश्रम घेतले.अश्या रितीने पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचा तिसरा वर्धापन दिनानिमित्त वरील प्रमाणे फळे वाटप करुन साजरा करण्यात आला.