ताज्या घडामोडी

कलाकारांच्या आर्थिक समस्यांकडे सरकार लक्ष देईल ?

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पुणे हडपसर कलाकार मंच तर्फे काल 30 ऑक्टोबर 2024 रोजी गरजू कलाकार यांना दिवाळी निमित्त फराळ साहित्य किट चे वितरण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले, नगरसेवक आबा तुपे, फिल्म डायरेक्टर दत्ता दळवी,नाट्य परिषदेचे संचालक अभिनेता दिलीप गुजर, अभिनेता प्रशांत बोगम, बंडुशेठ तुपे महेश ससाणे, अभिनेता जयराम रंधवे आदींच्या हस्ते हडपसर, पुणे येथे दिवाळी संध्या कार्यक्रमात करण्यात आले.


यावेळी गणेश रणदिवे, लहू पाटील, रौफ शेख,सागर कांबळे, मनोज चन्ना आदी कलाकारांनी त्यांच्या विविध कला देखील सादर केल्या.
त्याचप्रमाणे बालगंधर्व परीवार महाराष्ट्र राज्य व पुणे महानगर पालिका पुणे आयोजित एम आर बी फाऊंडेशन, समुत्ककर्ष एंडेव्हर्स प्रा लि, दिवा फाऊंडेशन व बडेकर डेव्हलपर यांच्या सौजण्याने नाट्य, कला, चित्रपट गरजू कलाकारांना दिवाळी निमित्त सामान किट चे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती मराठी बिगबॉस विजेता सूरज चव्हाण तसेच अतिथी म्हणून श्री. मेघराज राजेभोसले, संदीप खर्डेकर, बाळासाहेब दाभेकर, मनपा उपायुक्त श्री.नितीन उदास, नुकतेच सेवानिवृत्त झालेले डी वाय एस पी मोहिते साहेब,वृध्द कलावंत मानधन समिती अध्यक्ष श्री.सुरेश धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. राजेभोसले यांनी कलाकारांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी कलाकार महिला व पुरूष बचत गटांची निर्मिती केल्याचे जाहीर केले. उपयुक्त श्री. उदास यांनी बचत गटाची माहिती देवून नागरिकांची जबाबदारी काय आहे याबाबत देशहीताच्या दृष्टीने प्रतिज्ञा देखील उपस्थितांना दिली. यावेळी जसे एक दिवस आमदार असला तरी त्यांना पगार व पेन्शन मिळते तसे कलाकारांना मिळत नाही त्यामुळे कलाकारांना त्यांच्या उतार वयात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यासाठी सरकारने ठोस पावले त्वरित उचलावीत अशी ठोस भूमिका श्री. मोहिते यांनी मांडली. यावेळी सौ. जयमाला इनामदार, ज्योती चांदेकर, माया धर्माधिकारी आदी कलाकार अभिनेत्री देखील हजर होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. वर्षा पाटील, शोभा कुलकर्णी, श्री. पराग चौधरी यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close