गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील खाडीपार ते कवलेवाडा रस्त्याची दयनीय अवस्था
मुख्य संपादक:कु.समिधा भैसार
जीवन आधार फाउंडेशन फोर्स च्या कार्यकर्त्यांनी उठविला आवाज
गोंदिया उपसंपादक संजीव भांबोरे
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील खाडीपार ते कवलेवाडा या सहा किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे याकरिता आज जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स चे विदर्भ कार्यकारिणीचे सदस्य देवेंद्र दमाहे ,जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स चे नागेश बडोले, यांनी आज या रस्त्याबाबत पाहणी केली असता रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे लक्षात आले ,या क्षेत्रातील जनप्रतिनिधी आमदार ,खासदार ,यांनी
या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन दुरुस्त करण्याची मागणी येथील जीवन आधार फाउंडेशन रिस्की खुर्च्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे .याबाबत सविस्तर वृत्त की या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याने चालणे मुश्कील आहे. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. साधी सायकल ,टूव्हीलर चालवणे सुद्धा एक तारेवरची कसरत आहे .त्यामुळे येथील जनप्रतिनिधी ,शासन-प्रशासन यांनी या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे.