गोंडपीपरी येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
तालुक्यात पसरली शोककळा
शहर प्रतिनिधी : प्रमोद दुर्गे गोंडपीपरी
गोंडपीपरी तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे.तालुक्यास सह आता गाव खेड्यात कोरोना पसरला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सध्यस्थितीत कोरोनाचा कहर फक्त शहरात दिसून येत होता.आता मात्र कोरोना ग्रामीण भागात प्रवेश करण्यास सुरुवात केली चेक बोरगाव,धाबा,गोजोली इतर भागात कोरोना ग्रस्त रुग्ण आढळले आहे.दिवसेंदिवस हा आकडा मोठा होत असून चिंता जनक परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.
अश्यातच आज दिनांक १५/४/२०२१ रोजी गोंडपिपरितील प्रतिष्ठित व्यापारी सचिन मुंगले याला कोरोनाची लागण झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सचिन हा ३० वयोगटातील युवक असून सुशिक्षित,गोड स्वभावाचा आणि सधन कुटुंबातील होता.बऱ्याच दिवसापासून प्रकृतीत बिघाड असल्याने, त्याला उपचारासाठी स्थानीक ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. असा आकस्मिक रित्या कोरोनाने सचिन मुंगले या युवकाचा बळी घेतला.तालुक्यातील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. तरुण मुलाचा असा दुर्दैवाने अंत झाल्याने गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.