ताज्या घडामोडी

मानवत मध्ये भव्य पत्रकार भवन उभारणार…. माधवराव नानेकर

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

शहरात भव्य पत्रकार भवन उभारणार असून त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जागा देणार आहोत . असे कृ. उ. बा. समिती संचालक माधवराव नानेकर हे पत्रकारांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शनिवार दि.८ जानेवारी रोजी कै. पंडितराव विश्‍वनाथ यादव सभाग्रहात तालुक्यातील सर्व पत्रकार व प्रेस फोटोग्राफर यांचा दर्पण दिनानिमित्त पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, डायरी, पेन देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माधवराव नानेकर होते तसेच प्रमुख पाहुणे सचिव शिवनारायण सारडा सहसचिव संदिपान होगे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम झाडगावकर हे होते. मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आला.तसेच समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माधवराव नानेकर, शिवनारायण सारडा, संजय नाईक, श्याम झाडगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव होगे तर आभार प्रदर्शन गोविंद गोलाईत यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी पत्रकार संघाचे श्याम झाडगांवकर , विलास बारहाते, भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. सचिन चिद्रवार, रमेश यादव, प्रमोद तारे, इरफान बागवान, अलीम खान, गोविंद गोलाईत, संजय नाईक, सचिन मगर, आश्रोबा केदारे, कचरू लाल वर्मा, मुस्तकीन बेलदार, वसंत मांडे, हाफिज बागवान, वसीम सय्यद ,तसेच प्रेस फोटोग्राफर जयप्रकाश मिटकरी, दिगंबर मुळे, महेश दहे, संजय महात्मे, नंदू कच्छवे, संजय साबळे ,सचिन ढवळे यांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close