श्री साईबाबांच्या दिंडीचे पाथरी ते पंढरपूरकडे प्रस्थान
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी ते पंढरपुर पायी दिंडी चे टाळमृदंगाच्या गजरात प्रस्थान झाले. दिंडी निघण्यापूर्वी श्री साईबाबांचे परमभक्त आई तुळजाभवानी बँकेचे चेअरमन श्री प्रसाद फलके यांचे वतीने बँकेचे प्रतिनिधी श्री मिलिंद मनेरे व श्री महेश बोराटे यांचे उपस्थितीत दिंडीतील साई भक्तांना समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नारायण कुलकर्णी यांचे शुभ हस्ते टी-शर्ट वाटप करण्यात आले, प्रसंगी समितीचे प्रताप आमले, प्रभाकर पाटील, बालाजी बेंद्रे, व मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.
पूर्ण देशभरातून ही एकमेव साईबाबांची दिंडी आहे जी पंढरपूरला पायी जाते, गेल्या 25 वर्षांपासून समितीने ही परंपरा जोपासली आहे. या दिंडीत जाणाऱ्या भक्तांकडून वारकर्यांकडून कुठलीही ही फिस आकारल्या जात नाही साईभक्तांसाठी ही दिंडी पूर्णतः मोफत असते.
दिंडी निघण्यापूर्वी समितीचे कोषाध्यक्ष विश्वस्त श्री सूर्यभानजी सांगडे यांचे शुभ हस्ते परमपूज्य श्री साईबाबांच्या पादुकांचे पूजन व महाआरती करण्यात आली.
ही दिंडी साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथून निघताना सर्वप्रथम श्री साईबाबांचे कुलदैवत असलेल्या माळीवाडा येथील पंच बावडी हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन, श्री पंकज मैराळ यांच्या मळ्यात चहा पाण्याचा कार्यक्रम झाला तिथून पुढे श्री महादेवराव खारकर यांचा मळ्यात श्री साईबाबांची आरती व दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम झाला.
या दिंडीला व श्री साईबाबांच्या रथाला निरोप देण्यासाठी पाथरी शहरातील मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्रित आला होता. तसेच या दिंडीचे अध्यक्ष/ व्यवस्थापक अॅड. श्री मुकुंदराव चौधरी, श्री साई स्मारक समिती पाथरी चे व्यवस्थापकीय विश्वस्त मा.अॅड. श्री अतुलराव चौधरी, कोषाध्यक्ष विश्वस्त मा. श्री सूर्यभानजी सांगडे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री नारायण कुलकर्णी परम साईभक्त परभणीचे मा. श्री नागेन्द्र आनंतवार, श्री सुरेशराव चव्हाण श्री प्रताप आमले, श्री बालाजी बेद्रे व आदी मान्यवर उपस्थित होते.