खचलेली नाली ठरतेय अपघातास आमंत्रण

प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
ग्रामीण प्रतिनिधी : महेश शेंडे विठ्ठलवाडा
गोंडपिपरी – तालुक्यातील मौजा विट्ठलवाडा येथील नाली मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये रस्ता अरुंद असल्याने दोन हायवा ट्रकांच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे ओव्हरटेक करताना सदर नाली खचली.सदर नाली ही मुख्य मार्गालगत असून या मार्गावरून अनेक अवजड वाहने तसेच प्रवासी वाहनांची वर्दळ नेहमी सुरू असते.तसेच ही नाली मुख्य म्हणजे अगदी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरासोर असून अगदी एक वर्ष लोटूनही ही नाली बांधण्यात आलेली नाही.सदर नाली एखादा अपघात झाला तरच बांधणार काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गावातील सांडपाणी याच नालितून वाहत असते.पावसाळ्यात ही नाली तुडुंब भरून वाहत असते.पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ह्या नालीचे बांधकाम पूर्ण व्हावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.त्यामुळे ग्रामपंचायत विठ्ठलवाडाचे सदस्य या सदर बाबीकडे केव्हा लक्ष देणार हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.