ताज्या घडामोडी
पात्रुड रोड केला पण अरूंद पुल तसाच राहिला
शहर प्रतिनिधी : अलीम इनामदार पात्रुड
पात्रुड मध्ये सतत होत असलेल्या मूसळधार पावसामुळे सामान्य माणसाला जिव मूठीत घेऊन चालावे लागत आहे,
पात्रुड मध्ये गावा लगत असलेल्या सरस्वती नदी ला अनेक वेळा पूर आला आणि वाहतूक कोंडी झाली.
आणि सतत एक अडचण सुरुच आहे. मात्र रस्ता झाला पण पुलाचे काम अर्धवट सोडून दिले. या अर्धवट सोडलेल्या कामामुळे
या रस्त्यावर वाहणाऱ्या लोकांना त्रास काही कमी होत नाही.
अरुंद व खोलगट पुल असल्याने येथे पाणी साचत आहे,या रस्त्याचे काम जरी झाले असले तरी मात्र रस्त्यावरील देवळा, ऊमरी, सिमरी, पारगाव, जिवनापुर, लोणगाव, पात्रुड या पुलावरील अडचण कधी कमी होईल. यावर मात्र कोणतेच लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही.
रोड केला पण अरूंद पुल तसाच राहिला.