मोटेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष प्रवेश तथा शाखा उद्घाटन आणि पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमूर तालुक्यातील नेरी पासून जवळच असलेल्या मौजा मोठेगाव येथे चिमूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष राजू मुरकुटे यांच्या नेतृत्वात जिल्हा संघटक भाऊराव डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा मोठेगाव येथील महिला व पुरुषांनी दिनांक 21 एप्रिल 2022रोजी राष्ट्रवादी पक्षाची घड्याळ हाताला बांधली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी याच कार्यक्रमात दीपक दुधे यांची तालुका उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सर्कल प्रमुख मदनापुर _मोठेगाव यासाठी नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर धुरा देण्यात आली तसेच राष्ट्रपाल गोपिचंद गेडाम मोठेगाव पंचायत समिती सर्कल प्रमुख तथा शाखाध्यक्ष मोठेगावची धुरा त्यांच्याकडे देऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊराव डांगे जिल्हा संघटक हे होते तर प्रमुख पाहुणे राजू मुरकुटे चिमूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे होते. या कार्यक्रमात उपस्थितांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करून येणारा भावी काळ उज्वल कसा करता येईल तसेच महिला व पुरुष यांना शासकीय योजनेचा लाभ कशा प्रकारे घेता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन चिमुर तालुका अध्यक्ष राजू मुरकुटे यांनी केले. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये दुपट्टा टाकून हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा जिल्हा संघटक भाऊराव डांगे यांनी केले. या कार्यक्रमाला धनपाल खोब्रागडे, दीपक दुधे, राष्ट्रपाल गेडाम, भावराव डांगे जिल्हा संघटक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चंद्रपुर, राजू मुरकुटे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चिमूर, तसेच गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.