ताज्या घडामोडी
रेल्वे कामामुळे नागरिक त्रस्त
तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभूर्णे
ब्रम्हपुरी येथील रेल्वे स्टेशन येथील मिळालेल्या माहितीनुसार काही काम चालू असल्यामुळे ब्रम्हपुरीच्या रेल्वे फाटक जवळ दोन्ही बाजूने लांब रंगा लागल्या. महत्वाचे म्हणजे गडचिरोली जाण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडून जाव लागते आणि गडचिरोली जाण्याठी तोच एक मार्ग आहे त्यामुळे तिथे अडकून राहावं लागते कधी कधी एक एक दोन दोन किलोमीटर च्या गाडयांची रांग लागते व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तिथे रेल्वे पुलाचे काम सुरु आहे ते लवकर पूर्ण व्हावे हे नागरिकांची मागणी आहे.