डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा मानवत येथे अभ्यास गटाची स्थापना
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा येथे अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली.
अभ्यास गट स्थापन करायची गरज काय पडली?शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी इकडे तिकडे गल्लीबोळात फिरत असतात विशेष महणजे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे पालक कामधंद्यात मगन असतात पालकांचे विद्यार्थी वर शिक्षणाबाबत लक्ष नसते काही पालकांचं म्हणणं असते की विद्यार्थी घरी आल्यावर सहजा सहज अभ्यासाला बसत नाही पालकांचा ऐकत नाही, काही पालक म्हणतात की आम्हीच निरक्षर आहोत आम्हालाच काही येत नाही आम्ही विद्यार्थ्यांना काय शिक्षण द्यावे? अशी एक नाही अनेक समस्या विद्यार्थ्यांचे शिक्षणामध्ये येतात, मग या सारे समस्यावर मात करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी कोण निर्माण करायची? कशी निर्माण करायची ? याचाच एक भाग म्हणून अभ्यास गट हा एक चांगला उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे अभ्यास गट म्हणजे शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी आपापल्या गल्लीतले दहा-बारा विद्यार्थी एकत्र एका विद्यार्थ्यांचे घरी बसून ठराविक वेळाप्रमाणे गटामध्ये बसून चर्चेमार्फत रोज अभ्यास करतात त्याला अभ्यास गट असे म्हणतात अभ्यास गटाचे सर्व नियोजन वर्गशिक्षक करतात विद्यार्थ्या मधूनच एक विषय मित्र निवडला जातो विषय मित्राला दररोज वर्गशिक्षक वाचन व लेखन संबंधीत सर्व अभ्यास एका वहीमध्ये लिहून देतात अशाप्रकारे विषय मित्राच्या मार्गदर्शनाखाली गटातले सर्व विद्यार्थी अभ्यास करतात व सकाळी शाळेत आल्यावर वर्गशिक्षक अभ्यासाबाबत फॉलोअप घेतात व वर्गशिक्षक आठवड्यातून एकदा अभ्यास गटाला भेट देतात , सध्या आम्ही खडकपुरा कोतवाल पुरा व पेट मोहल्ला या तीन ठिकाणी सहा अभ्यास गटाची स्थापना पालकांचे हस्ते केलेली आहे आमचे पुढचे नियोजन अजून दुसऱ्या गल्लीत गट स्थापन करायचे आहे जागेबाबत थोडी समस्या येत आहे समस्यावर मात करू आणि अभ्यास गट स्थापन करू अशी आमची वाटचाल आहे विद्यार्थी एक मातीचा गोळा असतो त्याला शिक्षणामार्फत चांगले आकार दिले जाते विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर शिक्षणाचे धारेत राहावे अभ्यासात रमावे ,शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उपक्रमाचा हाच एकमेव उद्देश आहे या उपकरणासाठी सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पुढाकार घेतला.