ताज्या घडामोडी

नागपुर च्या डॉ.शर्वरी यांची मिस इंडिया म्हणून निवड

ग्रामीण प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड

जागतीक स्तरावरील सौंदर्य स्पर्धा मिस डायरसीटी २०२१ ही झांझीबार, टांझानिया येथे आयोजित केली आहे .या सौंदर्य स्पर्धेत डॉ.शर्वरी यांची मिस इंडिया म्हणून निवड झाली असून त्या भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
डॉ. शर्वरी यांनी लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, येथुन शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची त्यांच्या महाविद्यालय व नागपूर मध्ये ब्युटी वीथ ब्रेन अशी ओळख आहे. त्यांनी डीग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली असून सौंदर्य स्पर्धा पैकी फेमिना मिस इंडिया द्वारा २०१९ साली रायपूर छत्तीसगढ येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रींसेस कंपनी म्हणून निवड झाली. तसेच फेमिना मिस इंडियाच्या छत्तीसगढ स्पर्धेमधे पहिल्या पाच मध्ये येण्याचा बहुमान पटकवीला .
त्यांनी मिस अर्थ- वर्ल्ड डायव्हसीटी २०२१ या स्पर्धे मध्ये सुद्धा भाग घेउन महाराष्ट्राचा मान वाढविला होता. मिस वर्ल्ड डायव्हसीटी २०२१ या स्पर्धेत डॉ शर्वरी यांची मिस इंडिया म्हणून निवड करण्यात आली, कोवीडमुळे हि स्पर्धा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. डॉ शर्वरी या डॉ रत्नप्रभा रूडे, अधिव्याख्याता, प्राणीशास्त्र विभाग रा. म. गांधी महाविद्यालयात, नागभीड यांच्या कन्या आहेत. मिस वर्ल्ड डायव्हसीटी २०२१ स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी डॉ शर्वरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close