ताज्या घडामोडी

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ५०० ऊसतोडणी कामगारांना मुबंई येथील श्वेतांम्बर मूर्तिपुजक जैनसंधाच्यावतीने गृहोपयोगी वस्तुंचा संच भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

खरं तर साधु संतांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मानव समाज एक आहे, ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ उक्तीप्रमाणे जातीपातीतील दरी कमी करण्याचे कार्य सेवेतून होत असते म्हणुन सेवा कार्य हीच खरी “धर्मसेवा” व “मानवसेवा” आहे.याप्रमाणे आपल्या अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांचे काही दिवसांपुर्वी अवकाळी पावसाने झालेले हाल पाहुन “गोड साखरेची कडु कहाणी” अशी पोस्ट सोशियल मिडीयाव्दारे व्हायरल झाली व हे सर्व बघता अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन तसेच जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक आदरणीय श्री.सीताराम पाटील गायकरसाहेब व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक आदरणीय श्री.अशोकराव देशमुख(आण्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक काम करणारे मातोश्री शांताई भाऊसाहेब देशमुख फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष श्री.तात्यासाहेब अशोकराव देशमुख यांनी लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक आदरणीय श्री.सुरेशराव कोतेसाहेब,कल्याण कृषी उत्पन्न बाजारसमितीचे अभियंता आदरणीय श्री.नंदकुमार देशमुखसाहेब,उंचखडक बुद्रुकचे उपसरपंच माननीय श्री.महिपाल देशमुख(बबनराव) व मित्रपरिवाराने एक पाऊल पुढे टाकत तालुक्यात विविध ठिकाणच्या ऊसतोडणी कामगारांना ४०० ब्लँकेटचे वाटप केले हा सर्व सामाजिक उपक्रम तालुक्यात बोरी येथे गोशाळा चालविणारे श्री.संजय टिकेकरजी यांच्या गोशाळेच्या ग्रुपव्दारे मुंबईमधील अंधेरी येथील जैन समुदयाच्या आयोजित श्री श्वेतांम्बर मूर्तिपुजक जैनसंध अंधेरी पूर्व,श्री शंखेश्वर पार्श्वनाथ फाउंडेशन


संचालन: श्री दिव्य प्रकाश जैन मंडल यांच्या पर्यंत पोहचला त्यांनी तात्यासाहेब देशमुख यांच्याशी संपर्क साधत सर्व माहिती घेऊन मदत करण्याची ईच्छा व्यक्त केली आणि आज कारखाना कार्यस्थळावर ४५० ऊसतोडणी कामगारांना ब्लँकेट, सोलापुरी चादर,चटई,बॅटरी, मफलर,बकेट अशा प्रकारे आकरा गृहोपयोगी वस्तुंचा संच कारखान्याचे व्हा.चेअरमन आदरणीय श्री.सीताराम पाटील गायकरसाहेब यांच्या हस्ते देण्यात आला.अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एक दिवस आगोदर प्रत्येक कमगाराला एक टोकण देण्यात आले व वाटपाच्यादिवशी ते टोकण दाखवून संच देण्यात आला हा उपक्रम यशस्वी करण्याकरता कारखान्याच्यावतीने कार्यकारी संचालक माननीय श्री.अजीतराव देशमुखसाहेब,केन यार्ड अधिकारी श्री.सयाजीराव पोखरकरसाहेब,शेतकी अधिकारी श्री.सतिषराव देशमुखसाहेब व त्यांच्या सर्व सहकारी कर्मचारी तसेच मुंबई येथील शिरीष शाहाजी सर व त्यांच्या फाऊंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच श्वेतांम्बर मूर्तिपुजक जैनसंधाच्यावतीने व अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने तात्यासाहेब देशमुख यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच कारखान्याच्यावतीने मुबंई येथील उपस्थित पाहुण्यांचादेखील सन्मान करुन आभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close