सामाजिक कार्यकर्ते विजय कुडे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा
तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा
न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था सहसचिव विजय कुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज पाहून आज शेषनाग मंदिर परिसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. उखर्डा गावातली जेष्ठ नागरिक केशवराव जी मडावी यांच्या हस्ते करण्यात आले . न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने यावर्षी माझे गाव हिरवे गाव अभियान राबविण्यात येत आहे . वड,पिंपळ, गुलमोहर, निंब, करंजी अश्या वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रत्येक गावातील व्यक्तीने एक झाड लावावे व त्यांची जोपासना करावी असे आवाहन अभिजित कुडे यांनी केले , एक झाड घेऊया दत्तक या माध्यमातून प्रत्येकाला एका झाडाची जबाबदारी घ्यावी. पर्यावरण संरक्षण करणे गरजेचे आहे या कोरोना च्या भयंकर परिस्तिथी मध्ये आपल्याला प्राण वायूची खरी किंमत समजली . वृक्ष अनमोल असा प्राणवायू आपल्याला विनामूल्य देत आहे त्यामुळे त्यांची जोपासना करा असे आवाहन अभिजित कुडे यांनी केले . यावेळी न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे सचिव रोशन भोयर, विनोद कोठारे, बंडूजी पुसदेकर, ऋषिकेश पाटील, ऋषिकेश कुडे , अंश सातपुते, सोहन विठाडे , प्रवीण कुडे , दीपक कुडे , सचिन कुडे , स्वप्निल कुडे , साहिल पानतावणे उपस्थीत होते.