खेलो इंडीया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धा 2022 करिता आनंद निकेतन महाविद्यालयाच्या मल्लखांब खेळाडूंची निवड

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
श्री खुशाल दास विश्वविद्यालय, हनुमानगढ येथे 3 एप्रिल ते 6 एप्रिल 2022 दरम्यान झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या मल्लखांब संघाने क्रीडा प्रशिक्षक प्रा. तानाजी बायस्कर ,श्री.सुमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगीरी करत चौथा क्रमांक पटकावला आणि त्या संघाची जैन युनिव्हर्सिटी ,बेंगलोर, कर्नाटका येथे 23 ते 26 एप्रिल 2022 दरम्यान आयोजित होणाऱ्या खेलो इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी स्पर्धे करिता निवड झालेली आहे. सदर अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी संपूर्ण देशातून ऐकून 76 विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते.त्या 76 संघामधून गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने चौथा क्रमांक पटकावला.संघाचा कर्णधार म्हणून कुणाल दातारकर याच्या नेतृत्वाखाली लिलेश दडमल, हर्षल धांडे,ऐश्वर्य येटे, आदित्य डावे, अक्षय निखाते असे सहा खेळाडू होते.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू मा.डॉ.श्रीराम कावळे ,कुलसचिव डॉ. अनिल चिताडे ,क्रीडा संचालक मा.सौ.डॉ. अनिता लोखंडे, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ मृणाल काळे,उपप्राचार्य प्रा.सौ. राधा सवाणे ,संघाचे प्रशिक्षक प्रा.तानाजी बायस्कर आणि संपूर्ण क्रिडा शिक्षकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि खेलो इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.