लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने निवेदन
जिल्हा प्रतिनिधी: अहमद अन्सारी परभणी
मा.श्री जनरल मॅनेजर साहेब साउथ रेल्वे डीजल ऑफिस नांदेड येथे गंगाखेड रेल्वे टेशन वरचे प्रश्न गंगाखेड सर्व धावणाऱ्या गाड्या चा थांबा मिळण्याबाबत आज दि.1/11/2021 रोजी जनरल मॅनेजर गंगाखेड रेल्वे स्टेशन येथे मुलभूत भौतिक सुविधा प्रधन्याने मंजूर करण्याबाबत निवेदन देण्यात आले . गंगाखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकीकरण वाढत आहे. त्याचा ताण दळणवळण यावर होत आहे. या नागरीवस्ती लगतच रेल्वे टेशन आहे. त्या स्थानकांमध्ये बऱ्याच भौतिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. जसे की अध्यावत शौचालय पिण्याचे पाणीची सोय, प्रवाशांना प्रतीक्षालय, स्वच्छता ग्रह, लाईट तसेच फ्लायओवर ब्रिज एकच आहे त्यावर खूप ताण येत आहे. covid-19 काळापासून सामान्य जनरल तिकीट सुविधा बंद आहे ती त्वरित सुरू करावी.परळी- परभणी- नांदेड रोड राष्ट्रीय महामार्ग रेल्वे उड्डाण पुलाचे काम बऱ्याच वर्षापासून चालु आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून तात्काळ काम पूर्नवास जावे. जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही.परभणी लातूर राष्ट्रीय महामार्ग तहसील कार्यालय, गंगाखेड न्यायालय पंचायत समिती, कॉलेज, सुनील हायटेक शुगर कारखाना सोयाबीन मिल व सर्व सरकारी कार्यालय रेल्वे गेट च्या वर आहेत त्यामुळे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन जवळ उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग अति आवश्यकता आहे. रेल्वे स्थानकातून पालम, सोनपेठ, परळी वैजनाथ, लोहा, तालुका ग्रामीण भाग व परप्रांतातून खुप प्रवाशी करतात त्यामुळे या स्थानकावर सर्वच प्रवाशांना रेल्वे गाड्या थांबव्यात यावे. त्यासोबतच या गाड्या शिरडी काकीनाडा . कोल्हापूर धनबाद .नागपूर _ कोल्हापूर अमरावती_पुणे या गाड्याना गंगाखेड यथे थांबा मीळावा .
यापूर्वी बऱ्याच वेळा नांदेड डिव्हिजन रेल्वे यांना निवेदन देण्यात आले व विविध मागण्या संदर्भात संघटनेच्या वतीने निवेदन देऊनही बऱ्याच मागण्या झाल्या आपल्याकडून संघटना खूप आशादायी आहे. वरील सर्व मागण्याचा प्राधान्याने विचार करून मान्य कराव्यात. व शहराच्या विकासास व नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवण्यास हातभार लावावा.गंगाखेड रेल्वे स्टेशन वर असे निवेदन जनरल मॅनेजर साउथ रेल्वे ऑफिस नांदेड यांना देण्यात आले लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, अशोक मुरकुटे सामाजिक कार्यकर्ते,श्री.लक्ष्मण मुंडे पंचायत समिती सदस्य,
श्री.अनिल यानपलेवार अध्यक्षीय व्यापारी अध्यक्ष महासंघ गंगाखेड,महादेव मुंडे,गणेश माळवे, प्रदीप साळवे, त्रंबक नागरगोजे, विजय साळवे, पप्पू मुंडे,संजय साळवे उपस्थित होते.