विधानसभा क्षेत्रात सेवा कलश फाऊंडेशन द्वारा १०० कुपोषित बालकांना सकष आहार भेट

आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे कुपोषण मुक्तीचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी-नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे

प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वातून सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या पुढाकाराने आणि बाळु संस्थेच्या माध्यमातून राजुरा विधानसभा क्षेत्रात १०० कुपोषित बालकांना प्रत्येकी एक या प्रमाणे सकष आहार किट भेट देण्यात आले. आज गोंडपिपरी तालुक्यात २५ कुपोषित बालकांना सकष आहार किटचे वितरण करण्यात आले. या प्रत्येक किट मध्ये २ किलो मोट, २ किलो चना, २ किलो मुंग, २ किलो बरबटी, २ किलो वटाना, १ किलो नाचणी, १ किलो शेंगदाणे, १ किलो गुळ हे बाळु साहित्य भेट देण्यात आले.

या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना राजूराचे नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांनी सांगितले की, राजुरा विधानसभा क्षेत्रातून कुपोषणाच्या समस्येला हद्दपार करण्याचा आमदार सुभाष धोटे यांनी संकल्प केला असून सेवा कलश फाऊंडेशन यासाठी प्रयत्नशील आहे. कुपोषित बालकांना सकष आहार पुरवून राजुरा विधानसभा क्षेत्राला कुपोषण मुक्त करण्यासाठी सुरू केलेले हे अभियान आणि कुपोषण मुक्तीचे आमदार सुभाष धोटे यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर शंतनू धोटे यांनी सांगितले की सेवा कलश फाऊंडेशन सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य या क्षेत्रात काम करीत असून क्षेत्रातील चारही तालुक्यात सक्रिय सहभाग घेणार आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे, बाळू संस्थेचे अध्यक्ष अमित महाजनवार, बालविकास प्रकल्प अधिकारी शरद पारखी, तुकाराम झाडे, संतोष बंडावार, जितेंद्र गोहणे यासह कुपोषित बालक, त्यांचे आईवडील, पर्यवेक्षका, अंगणवाडी सेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. प्रास्ताविक सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे सचिव शंतनू धोटे यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थेच्या सदस्यांनी अनमोल सहकार्य केले.