ताज्या घडामोडी

टायगर ग्रुप गोंडपीपरीच्या वतीने नागरिकांना कोविड लसीचे रजिस्ट्रेशन मोफत

निखिल नामेवार यांचा पुढाकार

शहर प्रतिनिधी : प्रमोद दुर्गे
गोंडपीपरी

कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरी भागासह आता ग्रामीण भागातही कोरोनाने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे .गोंडपीपरी तालुक्यात कोरोनासह इतर आजाराने नागरिकांच्या मृत्यू संख्येत वाढ होत आहे. प्रशासनाच्या वतीने विविध विविध उपाय योजना केल्या जात आहे. नागरिकांना कोरोना ची लागण होऊ नये म्हणून लसीकरण शिबीराचे आयोजन केल्या जात आहे. 45 वर्ष वरील नागरिकांचे लसीकरण सुरुच आहे. त्या सॊबतच आता 18 ते 44 वर्षपर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे .त्याकरीता covin.gov. in ह्या संकेतस्थळा वर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. गोंडपीपरी तालुक्यासह खेड्या पाड्यातील 18 ते 45 वया पर्यंतच्या नागरिकांना गोंडपीपरी तालुक्यातील वढोली येथील सामजिक कार्यकर्ते तसेच टायगर ग्रुप गोंडपीपरी चे ऍक्टिव्ह अध्यक्ष निखिल नामेवार यांनी मदतीचा हात पुढे करत नागरिकांना मोफत रजिस्ट्रेशन करून देत आहेत. तालुक्यातील नागरिकांना कोविड लस रजिस्ट्रेशन मोफत करून देत गोंडपीपरी तालुक्यातील नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. त्यासाठी नागरिकांनी स्वतःचे आधारकार्ड , मोबाईल नंबर, 9657848038 ह्या व्हाट्स अँप नंबर वर पाठवून किंव्हा फोन कॉल करून रजिस्ट्रेशन मोफत करून घेण्याची विनंती करीत आहेत.
कोरोनाचा काळात गोंडपीपरी तालुक्यातील जनतेने मदतीचा हात पुढे करत तालुका निधीत इच्छुकानी स्वेच्छेने रक्कम देण्याचे आव्हान करण्यात आले असता तालुक्यातील शिक्षक, पोलीस, व्यापारी, सामाजिक कार्यकार्ये मदतीचा हात देत तालुका निधीत भर टाकत आहेत .असे असतांनाच टायगर ग्रुप गोंडपीपरीचे ऍक्टिव्ह अध्यक्ष निखिल नामेवार यांनी नागरिकांना मोफत रजिस्ट्रेशन करून मदतीचा हात देत असल्याने सर्व स्तरातुन त्यांचे कौतुक केल्या जात आहे. कोविड लस रजिस्ट्रेशन सुरू झाल्यापासून ते आज दिनांक 8 मे रोज शनिवारपर्यन्त 40 नागरिकांचे रजिस्ट्रेशन मोफत केल्याची माहिती टायगर ग्रुप गोंडपीपरी चे अध्यक्ष निखिल नामेवार यांनी दिली आहे.
या कार्यात निखिल नामेवारसह, गुरू चौधरी शहर अध्यक्ष टायगर ग्रुप गोंडपीपरी, गौरव झरकर शाखा अध्यक्ष टायगर ग्रुप वढोली,अमित मुंगोने, व भास्कर चौधरीसह टायगर ग्रुप गोंडपीपरी चे कार्यकर्ते मदत करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close