ताज्या घडामोडी

रेती घाटावर ड्रायव्हरचा मृत्यू

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल

मूल तालुक्यातील थेरगाव रेती घाटावर सकाळी सहा वाजताच्या दरम्यान अपघात होऊन रेती घाटावर काम करणारा ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या इसमाचे नाव किशोर बबनराव मुंगलेवार (40) मृतक हा चंद्रपूर येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक किशोर ट्रक वरून खाली पडल्याने जखमी झाला. प्रकृती गंभीर असल्याने त्याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केल्यानंतर उपचारा दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला. सध्या मूल तालुक्यातील रेती घाट सुरु झाले आहेत. हे घाट सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर रेती उपसा करता येत नाही. मात्र थेरगाव येथील घाटातून दिवस-रात्र 24 तास रेतीचा उपसा करण्यात येतो. आज भल्या पहाटे झालेल्या अपघातावरूनही ही बाब स्पष्ट झाली आहे. रेती घाटावर सकाळी सहा वाजता ट्रक वरून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला असल्याने सांगितले जात असले तरी जेसीपी चा धक्का लागल्याने किशोर यांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू होती. पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close