चिमूर नगरपरिषद वर झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाला यश
तालुका प्रतिनीधी: मंगेश शेंडे चिमुर
चिमूर नगर परिषद प्रभाग क्र, १७ मौजा काग येथील संपुर्ण नाल्या व साफसफाई व सोयी – सुविधा ऊपलब्ध करुन देण्यासाठी चार ते पाच महिन्यापासून मौजा काग वासीय नागरीकांनी याबाबत चिमूर नगर परिषद ला तोंडी तक्रार केली त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वांरवार निवेदन दीले त्या दिवेदनाद्वारे प्रहार स्टाईलने आंदोलनाचा ईशारा सुद्धा देण्यात आला होता मात्र चिमूर नगर परिषद नी त्या निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आज दि, 3-9-2121रोज शुक्रवारला या नगर परिषद चिमूर नी झोपेचे सोंग घेतलेल्या निष्क्रीय प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आदरणीय शेरखान पठाण महेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहीद बालाजी रायपुरकर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुष्पमाला अर्पण करुन किंल्यापासुन तर नगरपरिषदेपर्यंत नारे देत डफली बजाव आंदोलनाला सुरवात झाली काही वेळ आक्रमण आंदोलन चालल्यानंतर पोलीसांच्या मध्यस्थीने नगर परिषद येथील काही कर्मचारी हे आंदोलनाला भेट देऊन मध्यस्थी करत नगर परिषद मुख्यअधीकारी यांना निवेदन देण्यात आले काही मुख्यअधीकारी आंदोलनकर्ते यांच्यात वेळ चर्चा झाली, व काग गावकरी व प्रहार कार्यकर्ते यांनी रेटून धरलेल्या मागन्या ह्या उद्यापासून आठ दिवसाच्या आत पुर्ण होईल असे आश्वासन मुख्यअधीकारी यांनी दीले तीथुन आंदोलनाला स्थगिती देण्यात आली,
उपस्थित वार्ड क्र, १७ येशील रहिवासी व अशद मेश्राम व काग वासीय समस्त गावकरी नागरीक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते शेरखान पठाण, प्रवीण वाघे, अक्षय कामडी सुमीत दंडारे बारापात्रे चिमूर विनोद ऊमरे, आदी उपस्थित होते.