मनसे वरोरा तर्फ़े संस्कार केंद्रा च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
मनसे वरोरा तर्फे संस्कार केंद्र वरोरा च्या 16 विद्यार्थ्यांना बुक ,पेन,पेन्सिल इत्यादी साहित्यांचा वाटप करण्यात आले.साधना केंद्रात मूल, गोंडपिंपरी ,जिवती तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने त्यांना वरोरा येथील साधना केंद्रात जेवणाची ,राहण्याची व शिक्षणाची सुविधा व्हावी म्हणून सेवा निवृत्त शिक्षक चव्हाण हे प्रयत्न करीत असतात.आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना वरोरा शहरात उच्च शिक्षण मिळावे व मुलांवर चांगले संस्कार व्हावे यासाठी नेहमी चव्हाण सर आपल्या निवृत्ती वेतनातून विद्यार्थ्यांचा खर्च भागवत असतात.चव्हाण सरांच्या या सामाजिक उपक्रमाला हातभार म्हणून सामाजिक बांधीलकी जपत दरवर्षी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम मनसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी करीत असतात .यावर्षीही येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम मनसे वरोरा ने केले आहे.
शैक्षणिक साहित्य वाटप करतेवेळी यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी ,.कविता प्र.बदकी ,महाराष्ट्र सैनिक प्रणय मुडे , प्रतीक मुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.