ताज्या घडामोडी

चेतना माध्यमिक विद्यालय मजरा (रै) येथे शिक्षक दिन साजरा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील मजरा (रै) येथील चेतना माध्यमिक विद्यालय येथे आज सोमवार रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक एस.पि. ढवस यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे व्हि.ए.ढवस मॅडम, कु.एन.पी.देशकर मॅडम, काळे सर, रोडे सर, बुराण सर यांची यावेळी उपस्थिती होती. सर्वप्रथम डॉक्टर राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वयंशासनाचा उपक्रमांतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकेच्या भूमिकेत शिरूर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सहभाग घेतला. यावेळी पाहुण्यांच्या वाणीतून विद्यार्थ्यांना राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती दिली. यावेळी व्हि.ए.ढवस मॅडम, कु.देशकर मॅडम यांनी सुद्धा शिक्षक दिनाच्या निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालक कुमारी साक्षी केराम तर आभार साक्षी राऊत या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शिक्षकेतर कर्मचारी गिरी व अविनाश महाकाळे यांनी अथक परिश्रम घेऊन सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close