साहित्यसम्मेलने हि वर्तमानातील धम्मसंगिती व्हावी : ॲड. भुपेश पाटील
तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे चिमूर
आंबेडकरी साहित्य सम्मेलनाचा उद्देश केवळ परिसंवाद आणि कविसंमेलनापुरता मर्यादित न राहता ज्या प्रमाने भगवान बुद्धाच्या धम्म वचनानां नवा आयाम देन्यासाठी धम्म संगिती चे आयोजन प्राचीन काळात व्हायचे त्याच प्रमाणे साहित्य सम्मेलनाच्या निमित्ताने आंबेडकरी समाजाने आपले सामाजीक लेखापरीक्षण करुन जमा खर्चाचा लेखाजोखा मांडावा व सम्मेलने हि वर्तमानातील धम्मसंगिती व्हाव्यात अशी अपेक्षा आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक साहित्यिक कवी ॲड. भुपेश पाटील यानीं व्यक्त केली. चिमूर तालुक्यातील खानगाव येथे संपन्न जिल्हास्तरीय आंबेडकरी साहित्य सम्मेलनाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते आपले विचार व्यक्त करीत होते..
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, समता सैनिक दल, बौद्ध पंच कमीटी खानगाव यांच्या सयुक्त विद्यमाने या साहित्य सम्मेलनाचे आयोजन करन्यात आले होते या प्रसंगी मंचावर उदघाटक भदंत ज्ञानज्योती महाथेरो, सम्मेलनाध्यक्ष माणिक खोब्रागडे, स्वागताध्यक्ष घनश्याम रामटेके, प्रा. दिपककुमार खोब्रागडे, सुधाकर चौखे, प्रा. आत्माराम ढोक व निलकंठ शेंडे इ. मान्यवर उपस्थित होते.
सम्मेलनाचे उदघाटन समता सैनिक दलाची मानवंदना स्विकारून भदंत ज्ञानज्योती यानीं केले. उदघाटन सत्रात आपले विचार मांडतानां ॲड. भुपेश पाटील यानीं सांगितले कि आंबेडकरी समाजाच्या प्रगती आणि उन्नतीची गुरुकिल्ली हि बाबासाहेबानीं लिहुन ठेवलेल्या साहित्यात दडलेली आहे त्यामुळे हे साहित्यच जर नष्ट झाले तर येणाऱ्या पिढिचा भविष्यकाळ हा अंधकारमय झाल्याशिवाय राहनार नाहि त्यामुळेच बाबासाहेबांच्या साहित्याचे संवर्धन आणि प्रचार होण्यासाठी जागृती आणि सरकारवर सातत्याने दबाव आणणे गरजेचे आहे.
१९७६ ते २०२१ पर्यंत बाबासाहेबांच्या लेखन व भाषणे यांचे ह्या ४५ वर्षात फक्त २४ खंड प्रकाशित झालेत, सरकारी नियमानुसार वर्षाला २ खंड प्रकाशित करण्याची अट आहे, मग इतका ढिसाळ कारभार का? असा प्रश्नही त्यानीं उपस्थित केला. आंबेडकरी समाजाने एकूण समाजाला आपले वैयक्तिक व कौटुंबिक योगदान किती आहे याचा लेखाजोखा सामूहिकरित्या मांडन्याची संस्कृती निर्माण न केल्यामुळेच आज ह्या समाजाची राजकीय औद्योगिक आर्थिक मुल्य शुन्यावर आले आहे मात्र अशाही परिस्थितीत आमचं हक्काच म्हणावं अस संविधान आणि बाबासाहेबांचे विचार हेच आहेत म्हणूनच आम्ही पुन्हा कधीही गुलाम बनणार नाही या साठि संविधान आणि बाबासाहेबांचे साहित्य याचे सरक्षंण हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यानीं केले. या प्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातून साहित्यिक कवी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सामाजिक व सांस्कृतिक योगदान देनाऱ्या अनेक कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे सन्मान चिन्ह देवून करन्यात आला. दोन परिसंवाद व कविसंमेलन पार पडले प्रास्ताविक निळकंठ शेंडे यानीं तर संचालन आत्माराम ढोक व आभार प्रदीप रामटेके यानीं केले. या सम्मेलनास नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मीळाला.