शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे कार्यकर्ते जोपासा: -ह भ प तुलसीदास महाराज देवकर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शेतकरी संकटात असताना सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतोय आपण शेतकऱ्यासाठी हितासाठी झटणारे कार्यकर्ते जोपासण्याची गरजअसल्याचे मत ह भ प तुलसीदास महाराज देवकर त्यांनी व्यक्त केलं.
ते मंगळवारी वाघलगाव शिवारात शेतकऱ्याच्या शेतातील नादुरुस्त डीपी बद्दलून नवीन डीपीच्या पुजन वेळी बोलत होते. पुढे बोलताना महाराज म्हणाले की या शेतकऱ्याचा डीपी दिड वर्षापासून जळाला होता .याकडे कोनीच लक्ष घालत नव्हते. शेतकऱ्यांचे मित्र बनून काम करणारे सखाराम बोबडे पडेगावकर व त्यांच्या सहकार्यांनी मदत करून डीपी मिळवून दिला. डी पी मिळाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील जनावरांना पाणी पाजवू व पिकांना पाणी देण्याचे काम करू शकतो. असे पुण्याचं काम करणारे कार्यकर्ते समाजाने जोपासली पाहिजेत, मोठे केले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डी पी मिळउन देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, माजी सरपंच जयदेव मिसे, मुंजा लांडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच नारायण घनवटे यांनी केले. शेतकरी राम अलनुरे यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव धनवटे, हनुमान अल्लुरे, माधव आलुरे ,अंकुश आळनुरे, श्रीराम मुलगीर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीपी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.