पत्रकार संघाच्या मराठवाडा संघटक पदी पठाण अमरजान यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभागीय संघटक पदी येथे साप्ताहिक माझी नगरीचे संपादक पठाण अमजान यांची निवड करण्यात आली आहे.
असे की दिनांक 30 जानेवारी रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय कार्यकारणी निवड व बैठक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी,प्रदेशाध्यक्ष विजय कुमार वाव्हळ,राष्ट्रीय महासचिव विनोद पवार,प्रदेश उपाध्यक्ष दशरथ रोडे,राज्य संघटक भागवत वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या निवड बैठकीत राज्य कार्यकारणी सह राज्यातील विविध विभागीय,जिल्हा स्तरावरील पदांवर सदस्यांची निवड करण्यात आली.निवड बैठकीत साप्ताहिक माझी नगरीचे संपादन पठाण अमरजान यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य,मराठवाडा विभागीय संघटक पदी सर्वानुमते पुनर निवड करण्यात आली.
यावेळी रामनाथ कांबळे (बीड जिल्हा अध्यक्ष),ब्रह्मनाथ कांबळे (बीड जिल्हा उपाध्यक्ष), इरफान शेख (बीड जिल्हा उपाध्यक्ष),राजकुमार दिवार (कार्याध्यक्ष),पृथ्वीराज निर्मळ (कोषाध्यक्ष ),संतराम जोगदंड (बीड जिल्हा संघटक),श्रीमती मनीषा घुले,(प्रदेशाध्यक्ष महिला उद्योग विकास समिती),शेख तालीब ( पोलीस मित्र विकास समिती जिल्हाध्यक्ष ) आदींनी पठाण अमरजान यांना शुभेच्छा देत पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देणार