ताज्या घडामोडी

आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा! प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील यांचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

“आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांत पुढे राहिला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी विक्रमी होईल, याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. राज्यातील सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल, असं वाटत नाही. ही शंका जर खरी ठरली तर मध्यावधी व आगामी काळातील महानगरपालिका, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नेते, कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे,” असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणीतील ‘राष्ट्रवादी भवन’ येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी आढावा बैठकीस जिल्ह्यातील पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम तळागाळात घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वांनी कंबर कसली आहे. शेवटच्या माणसापर्यंत देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रमी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. ग्रामीण भागातून भरघोस प्रतिसाद आपल्याला मिळतोय. या सदस्य नोंदणीतून राष्ट्रवादीचा विचार घेऊन जाण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्या दृष्टीने नियोजन करून जिल्ह्यातील गावागावात पक्ष सदस्य नोंदणीचे काम आम्ही उभारले आहे. त्यामुळे आपल्या आवाहनाला साजेसे पक्षाचे काम इथे उभे राहिल, याची काळजी घेऊ,” अशी ग्वाही यावेळी भाषणाच्या माध्यमातून पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांना दिली.
यावेळी जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याचा आढावा जयंतराव पाटील साहेबांना सादर करून पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाबाबत माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यात मजबूत स्थितीत असून आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये लढण्यासाठी पक्ष सर्व प्रकारे सज्ज असल्याचा विश्वास त्यांना दिला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री राजेशभैय्या टोपे साहेब, जिल्हा प्रभारी बसवराज पाटील नागराळकर, मराठवाडा प्रभारी जयसिंगराव गायकवाड साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close