ताज्या घडामोडी

वादळाने कोर्धा गावातील मंदिराचे कळस कोसळले

ग्रामीण प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड

वादळाने मंदिराचा कळस कोसळल्याची घटना नागभीड तालुक्यातील कोर्धा येथे घडली .
आजपर्यंत तालुक्यात मंदिराचे कळस वादळाने किंवा पावसाने कोसळला अशी घटना परिसरात ऐकण्यास आली नाही , परंतु नागभीड तालुक्यातील कोर्धा गावात सकाळच्या वादळ व पाऊसामुळे चक्क मंदिराचे कळसच कोसळल्याने तेथील नागरिक आचार्य चक्कीत झाले ,
वादळ व जोराच्या पावसाचा धोका असल्यास अनेक लोक मंदिराचा आधार घेतात
परंतु अनेकांना आधार देणाऱ्या मंदिराचे कळस कोसळले ,
नागभीड तालुक्यातील ब्रम्हपुरी मार्गावर असलेल्या कोर्धा गावातील हनुमान मंदिराच्या कळसाचे बांधकाम १५ वर्ष आधी करण्यात आले.परंतु रात्री झालेल्या वादळासह जोराचा पाऊस झाला . यात सकाळी ५-४५ च्या सुमारास हनुमान मंदिर वरील कळस कोसळला . यात दुर्दैवाने जिवित हाणी झाली नाही ,

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close