ताज्या घडामोडी

नेरी तंमुसच्या पुढाकाराने प्रेमीयुगल झाले विवाह बद्द

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

चिमूर तालुक्यातील नेरी येथे आज महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या वतीने एका प्रेमीयुगुलाची विवाह दिनांक 22 फेब्रुवारी 2022 ला ग्रामपंचायतच्या आवारात लावून देण्यात आले. शिवरा तालुका चिमूर येथील नवोदित प्रेमवीर अभय बाळकृष्ण सावसाकडे वय (२८ वर्ष), जात माना व काहाली तालुका ब्रह्मपुरी येथील नवोदित वधु निराशा हिरालाल कुंभरे वय (21 वर्ष), जात लोहार या दोघांमध्ये मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध निर्माण झाले. वधु निराशा ची बहिण वराच्या गावात शिवरा येथे असल्यामुळे वधूचे नेहमी शिवरा येथे येणे-जाणे होते त्यामुळे दोघांची ओळख निर्माण होऊन त्यांचे पर्यावसान प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचे ठरवून “साथ जियेंगे साथ मरेंगे “या म्हणीप्रमाणे या दोन्ही प्रेमवीराने विवाह करण्याचे ठरविले आणि घरच्यांना न जुमानता मुलगी सरळ मुलाच्या घरी आली तेव्हा मुलांकडील मंडळींनी दोघांच्या संमतीने लग्न करण्यासाठी नेरी येथील तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर केला. समितीने अर्जाची रीतसर तपासणी करून उपरोक्त जोडप्यांचा हिंदू रितीरिवाजानुसार लग्न लावून दिले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष हरिदास चांदेकर, सरपंच रेखा पिसे, उपसरपंच चंद्रभान कामडी, माजी तंमुस अध्यक्ष जीवन वाघे ,ग्रामपंचायत सदस्य पिंटू खाटीक. वसंत कामडी, नानाजी दडमल, संगीता कामडी, सरिता जनबंधु, संगीता वैरागडे ,पद्यश्री संजय नागदेवते, ललिता कडूकार ,पद्या झिले ,साधना दडमल, उषा गराटे ,माजी पोलीस पाटील शंकर पिसे ,पत्रकार संजय नागदेवते, पत्रकार रामचंद्र कामडी, कन्नहासिंग भौंड, पंकज पाकमोडे ,माणिक नगराळे, गंगाबाई कामडी, सत्यभामा कामडी, म्हसली चे सरपंच संकेत सोनवणे, मधुकर ननावरे, समस्त ग्रामपंचायत कर्मचारी आणि इतर गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close