ताज्या घडामोडी

मल्लिकार्जुन गौडा यांच्या विरोधात जिल्हाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपति व राज्यपाल कर्नाटक यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कर्नाटक येथिल रायचूर जिल्हा चे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी 26 जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांची प्रतिमा हटावल्या शिवाय झेंडावंदन केले नाही म्हणून त्यां जातीवादी न्यायाधिशावर एट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा तसेच त्याचे नागरिकत्व रद्द करून त्याला न्यायव्यवस्थेतुन बेदखल करावे असे निवेदन मानवी हक्क आभियान परभणी जिल्ह्यातुन परभणी जिल्हाधिकारी मार्फत
महामहिम राष्ट्रपति यांना व राज्यपाल कर्नाटक यांना देन्यात आले आहे यावेळी मानवि हक्क आभियान जिल्हा अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहर अध्यक्ष, बहुजन मजुर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व सर्व मानवी हक्क आभियान टिम परभणी हे सर्व निवेदन देतांना उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close