ताज्या घडामोडी

योगेश्वरी शुगर्सच्या २० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यंक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर्स लक्ष्मीनगर लिंबा.च्या २० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम अग्निहोत्री यज्ञेश्वर महाराज सेलूकर,अतुल महाराज खांडविकर यांच्या शुभ हस्ते मंत्रोच्चारात अग्नीप्रज्वलित करून या साखर कारखाण्याचे जेष्ठ संचालक माजलगावचे माजी आ आर टी देशमुख तथा त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कुंदाताई आर देशमुख,कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख,संचालक डॉ अभिजित देशमुख, राहुल देशमुख यांच्या शुभ हस्ते बॉयलर पेटवण्यात आला.

या वेळी प्रमोटर लक्ष्मीकांतराव घोडे, गंगाधरराव गायकवाड, इंदरराव कदम,आश्रोबा कडपे,सुदामराव सपाटे,बीड जिल्हा बँकेचेउपाध्यक्ष गोरख धुमाळ,मोहनराव देशमुख,कल्याणराव देशमुख,बबनराव सोळंके, दिलिपराव बडे,दिपक सोळंके,संतोषराव रणेर,बालासाहेब बडे प्रतिष्ठीत नागरीक तथा उस उत्पादक नारायण राठोड,पाराजी इदगे,प्रभाकर राठोड,आशोक घुंबरे,किरण घुंबरे,मुंजाभाऊ टाकळकर यांची उपस्थिती होती.

माजी केंद्रिय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्व अशोकसेठ सामत यांनी २००१ साली अवघ्या अकरा महिण्यात या खाजगी तत्वा वरील साखर कारखाण्याची लिंबा येथील गोदावरी नदी काठावर उभारणी करून तालुक्याच्या दक्षिण भागासह पाथरी,मानवत,सोनपेठ,गंगाखेड,माजलगाव तालुक्यातील उस उत्पादक,कामगार कर्मचारी यांच्या जिवणात ख-या अर्थाने अर्थिक क्रांती आणली. गेली २० वर्षा पासुन हा साखर कारखाना अखंड पणे सुरू आहे. अनेकदा उसाची कमतरता असतांनाही शेतकरी कामकारांचे हित जोपासत हा साखर कारखाना सुरू ठेवण्याचे काम व्यवस्थापणाने केले. गत वर्षी पासुन जायकवाडी चे पाणी नियमित मिळत असल्याने आणि गोदावरी वरील उच्चपातळी बंधारे पुर्ण क्षमतेने भरत असल्याने या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करत आहेत. शेतक-यांच्या शेतातील शेवटचा उस जाई पर्यंत हा साखर कारखाना चालवला जाईल असे या साखर कारखाण्याचे जेष्ठ माजी आ आर टी देशमुख सांगतात.रविवारी १० ऑक्टोबर रोजी ललीता पंचमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी साडे नऊ वाजता अग्निहोत्री यज्ञेश्वर महाराज सेलूकर आणि अतुल महाराज खांडवीकर यांच्या हस्ते मंत्रोच्चारात अग्नीप्रज्वलीत करून या साखर कारखाण्याचे चेअरमन माजी आ आर टी देशमुख सौ कुदाताई आर देशमुख, कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख संचालक डॉ अभिजित आर देशमुख,राहुल देशमुख यांच्या हस्ते बॉयलर अग्नीप्रदिपण कार्यक्रम संपन्न झाला. पावसाची उघाड मिळतात प्रत्यक्षात पुढील आठ दहा दिवसात ऊस गाळपाला सुरूवात होणार असल्याचे जेष्ठ संचालक माजी आ आर टी देशमुख यांनी तेजन्यूज शी बोलतांना सांगितले. या वर्षी या साखर कारखाण्याला केंद्र शासनाने ४५ केएलपीडी असवनी परकल्पाला मंजुरी दिली असून प्रत्यक्षात पुढील हंगामात हा असवनी प्रकल्प सुुरू होईल ज्या मुळे शेतक-यांना ही दोन पैसे अधिकचे मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. या वर्षी अतिवृष्टी झाल्याने इतर पिके हातची गेली आहेत. आता ऊस हेच पिक शेतक-यांना दोन पैसे देऊन जाणार आहे. हंगाम मोठा असल्याने संपुर्ण हंगामाचे जवळपास जुन पर्यंत गाळपाचे नियोजन केले असल्याचे जेष्ठ संचालक आर टी देशमुख म्हणाले. सलग तीन वर्ष जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याने कारखाना उभारणी पासुन प्रथमच सलग तीन वर्ष पुर्ण क्षमतेने सात ते आठ महिने गाळप सुरू राहाणार आहे.

या कार्यक्रमा साठी कारखण्याचे अधिकारी अनंत बावने,पी ए हेडे,मुकेश रोडगे,देविदास मोकाशे,राजकुमार तौर,सोमनाथ सावंत,संजय महाजन,पांडूरंग जाधव,नामदेव हारकाळ, आदी शेतकरी,कर्मचारी यांची या वेळी उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close