घरी असलेल्या रेती वर तहसीलदार यांनी केली जप्तीची कारवाई
रेतीसाठा जप्तीसाठी महसूल विभागाचे अधिकारी तब्बल चार तास पिपर्डा गावात .
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
चिमूर तहसीलदारांच्या नेतृत्वातील पथकाने पिपर्डा येथील नागरिकांनी घरी जमा करून ठेवलेली जवळपास २० ब्रास रेती जप्त केली आहे. विशेष म्हणजे घरी जमा केलेली रेती जप्त करण्याची ही तालुक्यातील पहिलीच वेळ आहे.रेती घाटांचे लिलाव झाले नसतानाही चिमूर तालुक्यातील पिपर्डा येथील नागरिकांनी घर बांधण्यासाठी रेतीचा साठा करून ठेवला होता. याबाबत चिमूर च्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार पिपर्डा येथे मंगळवारी भेट दिली असता नागरिकांच्या दारासमोर रेतीचे ढिग पडले असल्याचे दिसून आले. रॉयल्टीबाबत विचारणा केली असता, नागरिकांकडे रॉयल्टी आढळून आली नाही. त्यांच्याकडील रेती जप्त करण्यात आली .
महसूल प्रशासनाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. सदर कारवाई तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्या उपस्थित मंडळ अधिकारी आर आर तिडके, कुंभरे, तलाठी राजू ननावरे,ठाकरे,वाघमारे,यांच्या पथकाने केली.
जप्त केलेल्या रेतीचा लिलाव केल्याची नागरिकांत चर्चा आहे.
विशेष म्हणजे तहसीलदार मॅडम यांनी शासकीय वाहन न आणता नेरी येथील तलाठी यांचे खाजगी वाहनाने पिपर्डा गावात १२ वाजेपासून ४.३० वाजेपर्यंत चौकशी करीत होत्या.या पथकात तहसीलदार मॅडम, दोन मंडळ अधिकारी, तीन तलाठी असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.