ताज्या घडामोडी

पळवून नेणे व पोक्सो गुन्ह्यातील फरारी आरोपीला सीताफीने अटक

कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी..

प्रतिनिधीः प्रमोद राऊत कराड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून पळून नेल्याचा गंभीर अपराध करून पोलिसांची नजर चुकवून फरार असणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्या आरोपीला अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डी वाय एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते त्याप्रमाणे कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अंमलदार यांनी या गुन्ह्यातील फरारी आरोपी बजा उर्फ बजरंग सुरेश माने राहणार बुधवार पेठ कराड याची गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळवून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव महेश शिंदे यांनी कराड शहरालगत वारुंजी फाटा पाटण रोड येथे सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी बजा उर्फ बजरंग सुरेश माने याला पाठलाग करून शिताफिने अटक केली आहे.. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष फडतरे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवायएसपी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई संजय देवकुळे हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे, पोलीस अंमलदार अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे आनंदा जाधव महेश शिंदे संग्राम पाटील सोनाली पिसाळ यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close