आशा वर्कर व गटप्रवर्तकांच्या ठिय्या आंदोलनाला एक महिना पूर्ण

अद्याप शासनाने घेतली नाही त्यांच्या रास्त मागण्यांची दखल

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे रास्त मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी देखील या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला आहे.दरम्यान चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते गेल्या काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन करीत आहे.या आंदोलनाला आज एक महिना पूर्ण झाला असून बुधवारी मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी मुंबईकडे रवाना होत असल्याची माहिती काॅ.रविन्द्र उमाठे यांनी आज चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान दिली आहे. मागण्यांची पूर्तता तातडीने न झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा काॅ रविन्द्र उमाठे व काॅ.प्रकाश रेड्डी यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.