98 पाथरी विधानसभेसाठी आज शुक्रवार रोजी चार उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी जिल्हा पाथरी : विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू असून शुक्रवारी चौथ्या दिवशी चार उमेदवारानी अर्ज दाखल केले. दि. 25 अखेर एकूण 10 उमेदवारानी 12 अर्ज दाखल केले आहेत.
दि. 25 रोजी शेख मुस्ताख शेख रज्जाक पाथरी यांनी अपक्ष म्हणून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मोहन जनार्धनराव कुलकर्णी पाथरी, शिवाजी देवजी कांबळे पेडगाव यांनी अपक्ष म्हणून तर यापूर्वी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या त्रिंबक देविदास पवार यांनी ऑल इंडिया हिंदुस्थान काँग्रेस पार्टी या पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दि. 26 व 27 रोजी कार्यालयास सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि. 28 व 29 हे दोनच दिवस शिल्लक आहेत अशी माहिती 98 पाथरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली.