ताज्या घडामोडी

मूल तालुक्यातील भेजगाव येथे वाघाचा बछडा आढळला

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल

भेजगाव येथे भाऊजी धोंगडे यांच्या शेतातील विहिरीत चार-साडेचार महिन्याचा वाघाचा बछडा पडलेला आढळला हे माहिती त्वरित चिचपल्ली चे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांना देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.
मुल येथील संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य उमेश सिंह झिरे, मनोज रणदिवे, पंकज उजवणे, राहुल जिरकुंटवार, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्निल लेनगुरे, स्वप्निल आकेवार, अंकुश वाणी, प्रतीक लेनगुरे,संकल्प गणवीर , यश मोहूर्ले हे सुद्धा घटनास्थळी त्वरित उपस्थित झाले.
अतिशीघ्र कृती दल चंद्रपुर व अतिशीघ्र कृती दल ताडोबाचे राजू बडकेलवार,अजय मराठे व टीम यांनी विभागीय वनअधिकारी सारिका जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनात वाघाच्या बछड्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढले.
या सर्व कार्यवाही दरम्यान सहाय्यक वन संरक्षक श्रीनिवास लखमावाड , आर. एफ. ओ. कारेकार, डॉ. पोडचलवार, क्षेत्र सहाय्यक खनके, क्षेत्र सहायक मेश्राम, वनरक्षक गुलगुले,मानकर, मरस्कोल्हे, रोगे, मडावी मॅडम व पोलीस दलातील लोक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close